



About Viren Vivah Sanstha
लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील खूप आनंदाचा क्षण आहे आणि तो जीवनात एकदाच येतो. प्रत्येक जण हा क्षण अविस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न करत असतो. पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता, लग्नासाठी होणारा खर्च आणि इतर अनेक बाबी सांभाळणे थोडे कठीण झाले आहे. याचाच विचार करून विरेन मंगल कार्यालय तर्फे आम्ही तुमचा हा खास क्षण संपूर्ण विधींसहित, कमीत कमी खर्चामध्ये आणि अविस्मरणीय पद्धतीने साजरा करण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत. आळंदी येथे हॉल, डेकोरेशन, विधी साहित्य, ब्राह्मण, वर-वधूसाठी लागणारे हार तसेच जेवण — या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जातात. तुमच्या लग्नाचा सुंदर आणि मंगलमय सोहळा साधेपणाने, पारंपरिक पद्धतीने आणि कमी खर्चात करण्यासाठी आजच विरेन मंगल कार्यालयाला अवश्य भेट द्या.
स्थळ: पुणेकर बिल्डिंग, चाकण चौक, तुळशी वृंदावनजवळ, आळंदी देवाची, पुणे, आळंदी, महाराष्ट्र – ४१२१०५
विवाह विधी खालीलप्रमाणे:
1. श्री गणपती पूजन 2. वरुण पूजन 3. पुण्याहवाचन 4. सुपारी फोडणे 5. साखरपुडा 6. टिळा 7. हळदी समारंभ 8. मंगलाष्टका 9. मंगलसूत्र बंधन 10. कन्यादान 11. कानपिळी 12. साडे 13. लज्जा होम 14. सप्तपदी
Services
आमच्याकडे रजिस्टर पद्धतीने कोर्ट मॅरेज, लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज, मॅरेज सर्टिफिकेट, तात्काळ मॅरेज तसेच वैदिक पद्धतीने विवाह योग्य पद्धतीने व आवश्यक मार्गदर्शनासह करून दिले जातात. विवाह प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे, नोंदणी व इतर बाबींमध्ये संपूर्ण सहकार्य केले जाते.
कोर्ट मॅरेज
कायदेशीर प्रक्रियेनुसार कोर्ट मॅरेज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची तयारी, अर्ज प्रक्रिया आणि मार्गदर्शन येथे केले जाते. कमी वेळेत आणि योग्य पद्धतीने विवाह नोंदणी करून विवाह प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संपूर्ण सहकार्य व आवश्यक मार्गदर्शन दिले जाते.
लव्ह मॅरेज
आपल्या पसंतीच्या जोडीदारासोबत विवाह करण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया आणि कागदपत्रांबाबत संपूर्ण मार्गदर्शन मिळेल. कुटुंबीयांच्या संमतीसह किंवा आवश्यक कायदेशीर प्रक्रियेनुसार विवाह नोंदणी करून देण्यासाठी अनुभवी मार्गदर्शन आणि सहकार्य दिले जाते.
पुनर्विवाह
पुनर्विवाहासाठी आवश्यक असलेली कायदेशीर प्रक्रिया, कागदपत्रे आणि विवाह नोंदणी याबाबत योग्य मार्गदर्शन दिले जाते. सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून नियमानुसार विवाह प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक सहकार्य उपलब्ध करून दिले जाते.
अंतरजातीय विवाह
अंतरजातीय विवाहासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया आणि कागदपत्रांबाबत योग्य मार्गदर्शन व सहकार्य दिले जाते. विविध सामाजिक व कौटुंबिक परिस्थिती लक्षात घेऊन नियमानुसार विवाह नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रियेची माहिती दिली जाते.
Facilities
उपलब्ध सोयी एक्झिक्युटिव्ह हॉल, दर्जेदार केटरिंग ,सर्वोत्तम पंडित जी, योग्य विधी साहित्य ,आकर्षक सजावट ,आकर्षक फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी सक्रिय वेटर
नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे
नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे :-
1) वधू – वर यांचे आधार कार्ड / मतदान कार्ड
2) शाळा सोडल्याचा किंवा जन्माचा दाखला
3) 5-5 पासपोर्ट साईज फोटो
साक्षीदारांच्या ओळखपत्रात खालीलपैकी एक आसणे आवश्यक आहे.
दोघांमध्ये मिळून तीन साक्षीदार
1) साक्षीदारांचे आधार कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन/ मतदान कार्ड
2) 1-1-1 पासपोर्ट साईज फोटो
रजिस्ट्रेशन ( नोंदणी ) करणेविषयक माहिती
रजिस्ट्रेशन ( नोंदणी ) वर किंवा वधू ज्या गावात राहत असतील त्या गावच्या तालुक्याच्या ठिकाणी सबरजिस्ट्रार कचेरीमध्ये करणे आवश्यक आहे . सरकारी नियमाप्रमाणे रजिस्टार नोंणी फॉर्मवरती कोर्ट फी स्टॅम्प रु .१०० लावणे व सदर नोंदणी ३ महिन्याच्या आत करणे आवश्यक आहे . रजिस्ट्रेशन करतेवेळी वर वधू व ३ साक्षीदार आणि वर नमूद केलेली कागदपत्रे घेऊन जाणे आवश्यक आहे . नोंदणी ३ महिन्याच्या आत न केल्यास सरकारी नियमाप्रमाणे दंड आकारला जाईल .
प्रेम विवाहासाठी पालकांना आणू न शकणाऱ्या वधु वरांनी ५०० रु . च्या स्टॅम्प पेपर वर दोघे एकमेकांशी स्वखुशीने विवाहास तयार असल्याची तसेच घरातून मौल्यवान चिज वस्तू आणली नाही असे स्पष्ट नमूद करावे . अशा प्रकारची विवाहपूर्व संमतिपत्र करून देणाऱ्या भारत सरकार अधिकृत नोटरी अॅड . ची माहिती आमच्या मंगलकार्यालयात विनामूल्य मिळेल .
वधू – वर एका जातीचे असतील तर तो विवाह सजातीय ! वधू – वर वेगवेगळ्या जातींचे असतील तर तो आंतरजातीय विवाह ! अशा आंतरजातीय ( १ खुल्या गटातील जात २ मागास , इतर मागास ) विवाहास १ फेब्रुवारी २०१० पासुन सरकार अनुदास देते . त्यासाठी मामलेदार , तहसीलदार यांच्याकडील जातीचे प्रमाणपत्र आणि विवाहाचे प्रमाणपत्र आवश्यक असते .
वधू – वर रहात असलेल्या ठिकाणाच्या ग्रामपंचायती , नगरपालिका येथे आणि पुण्यात रजिस्टर विवाह नोंद होते . पिंपरी चिंचवड पुणे महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या वधू – वरांचे विवाह प्रभाग कार्यालयातून १०४ रुपयांस मिळणाऱ्या ‘ ड ‘ फॉर्म भरल्यावर नोंदले जातात .
नियम
अ ) वर – वधू घटस्फोटीत असल्यास घटस्फोटाची कागदपत्रे . ब ) वर – वधू विधूर किंवा विधवा असल्यास पहिल्या पत्नीच्या / पतीचा मृत्युचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
Gallery

































